दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप

Foto
 कन्नड, (प्रतिनिधी) : शिक्षण विभागाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अँलिम्को मोजमाप व साहित्य साधनाचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यक सामग्रीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये तालुक्यातील ६१ दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप केले. ८१ दिव्यांग विद्यार्थ्यांचे मोजमाप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर तर प्रमुख पाहुणे जिल्हा समन्वयक (समवेशित शिक्षण) गणेश बेडके उपस्थिती होते. दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत.

 योग्य प्रोत्साहन, शिक्षणसुविधा आणि प्रेम मिळाल्यास ते नक्कीच उज्वल भविष्य घडवू शकतात. समाजाने त्यांच्याविषयी संवेदनशील राहून त्यांच्या सूर या शिबिरात निघाला. साहित्य हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पालकांनी शिक्षण विभाग व पंचायत समिती प्रशासनाचे आभार व्यक्त केले. शिबीर राबविण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गट शिक्षणाधिकारी सबाहत शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वीतेसाठी समावेशित शिक्षण विभागातील नितीन वाघ, कडुबा भुसारी, उत्तम आघाडे प्रशांत अहिरराव, प्रविण वाकेकर, अयुब सय्यद, युनूस सय्यद असिफ शेख, श्रीमती शेख, निलम परदेशी, अलका गंगुले, दीपा पवार, खुशाल राठोड तसेच सर्व केंद्रप्रमुख व केंद्रीय मुख्यध्यापक यांचे सहकार्य लाभले.